अहमदनगर क्राईम

तरुणाला मारहाण करत रोख रकमेसह 60 हजारांचा ऐवज लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime News : तालुक्‍यातील काष्टी येथील प्रताप अरुणराव भोर या तरुणाला चारजणांनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून गळ्यातील दोन तोळा वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैनसह खिशातील ४ हजार ७०० रुपयांची रोख रक्‍कम चोरुन नेला.

या प्रकरणी वैभव सुभाष चौधरी (रा.चौधरी मळा, साई मदने रा.काष्टी) यांच्यासह दोन अनोळखी इसमावर प्रताप भोर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे काष्टी वेथोल येबले हॉटेल समोर आपल्या मित्रांच्या सोबत चहा पीत बसले होते.

यावेळी आरोपी वैभव सुभाष चोधरी (रा.काष्टी) याने त्याच्या व अनोळखी मित्रांसोबत विनानंबर गाडीतून येऊन शिवोगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व निघून गेले. त्या नंतर फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयाचे पाठीमागे संध्याकाळी ७.३० बा थांबले असता आरोपी वैभव सुभाष चोधरी,

साई मदने आणि दोन अनोळखी मित्रांसोबत येऊन फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करून फिर्यादीच्या गळयातील दोन तोळ्याची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व खिशातील ४ हजार ७०० रुपये रोख बळजबरीने काढून घेतले.

Ahmednagarlive24 Office