अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : नात्यातीलच एका महिलेने तीच्या मित्राच्या मदतीने घरातून ऐवज लंपास केला आहे.
ही घटना पुण्यातील बिबडेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेला अटक केली असून पोलीस तिच्या साथीदाराचा शोध आहेत.
एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादिचा चाकणमध्ये व्यवसाय आहे.कोरोनामुळे बँका बंद होत्या.
त्यामुळे व्यवसायातून जमलेली सुमारे एक कोटीची रोकड घरात ठेवली होती.
फिर्यादीच्या नात्यातील एका महिलेला घरात मोठ्या प्रमाणावर रोकड तसेच दागिने ठेवल्याची माहिती होती.
या महिलेची धनकवडीतील बालाजीनगर भागातील एका व्यक्तीबरोबर ओळख होती.
या ओळखीतून तिने स्वतःच्या घरात चोरी करण्याचा कट रचला.
नातेवाईक महिला आणि तिच्या मित्राने संगनमत करून घरातून दागिने घरात ठेवलेली एक कोटी रुपयांची रोकडही लांबविली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews