मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देणे व दीड तोळा सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याप्रकरणी रुपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आदिनाथ संजय मिठे याने आमच्या मुलीबरोबर काढलेले फोटो दाखवून बदनामी केल्याने त्याला समजावून सांगण्याकरीता गेलो असता, अविनाश संजय मिठे, रवी संजय मिठे, संजय मच्छिद्र मिठे (सर्व रा. रूपेवाडी, ता. पाथर्डी यांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच पाठीवर दगड मारून गळ्यातील दीड तोळा वजनाची सोन्याची चैन बळजबरीने काढून घेतली व जीवे मारण्याची धमकी देऊन मुली बरोबरचे फोटो व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यावरून सोनई पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोमनाथ झांबरे पुढील तपास करीत आहे.