Ahmednagar Crime News : पैश्यांसाठी विवाहितेचा छळ ‘त्या’ पतीविरोधात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime News : गाडी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन त्यानंतर ३ लाख रूपये माहेरहून आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती संभाजी पिसे (वय ४३, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. कुशाबा नगरी, सावेडी, ता. जि. अहमदनगर, वांबोरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

संभाजी चंद्राभान पिसे हा कर्जत येथे महामंडळ विद्युत महावितरण कंपनीमध्ये ज्युनियर ऑपरेटर म्हणून काम करतो. १२ डिसेंबर १९९८ साली भारती संभाजी पिसे यांचा विवाह संभाजी चंद्राभान पिसे याच्या बरोबर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे झाला होता.

लग्न झाल्यानंतर आरोपी पिसे याने सुरुवातीचे २ ते ३ वर्षे भारती पिसे यांना चांगले नांदविले. त्यानंतर पती संभाजी हा नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरुन तसेच घरगुती कारणावरुन भारती पिसे यांच्याशी वाद घालुन मारहाण करत.

त्यानंतर पती संभाजी याने गाडी घेण्याकरीता माहेरहून २ लाख रुपये घेवून ये, असे म्हणुन भारती यांना त्रास देत असल्याने त्यांनी आई वडीलांकडुन २ लाख रुपये आणुन पतीला दिले. त्यानंतर काही वर्षाने अहमदनगर येथे घर घ्यायचे आहे.

तुला जर नांदायचे असेल तर तु तुझ्या आई वडीलांकडून ३ लाख रुपये घेवून ये. असे म्हणाल्याने भारती यांनी आई वडीलांकडून तीन लाख रुपये आणून दिले. त्यानंतर आरोपी पती संभाजी पिसे हा नेहमी पत्नीशी वाद घालुन शारिरीक व मानसिक छळ करत असे.

तु पुन्हा माहेरहून पैसे घेऊन ये, असे पत्नीला म्हणुन त्रास देऊ लागला. संभाजी पिसे याने घराचे हप्ते थकले म्हणुन हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैशाची मागणी केली.

त्यावेळी भारती पिसे यांनी पुन्हा वडील व भाऊ यांच्याकडून घराचे थकित हप्ते भरण्यासाठी ३ लाख ५२ हजार रुपये आणुन त्यांच्या बँक खात्यातुन हप्ते भरले.

त्यामुळे संभाजी पिसे हा पत्नीला त्रास देत असल्याने भारती संभाजी पिसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती संभाजी पिसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.