Ahmednagar Crime : विवाहितेचा विनयभंग त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : एका महिलेच्या दुकानावर जाऊन दोघांनी तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटना याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात पिडीत विवाहितेचे दुकान आहे. त्या जवळच राहणाऱ्या आरोपीने सदर विवाहितेला फोन करून मेकअपचे साहित्य आहे का? अशी विचारणा करुन तो त्यांच्या दुकानावर गेला.

माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझेशी फ्रेडशिप कर मी तुला लॉजवर घेवुन जातो असे तो या महिलेला म्हणाला. ती आरोपीस समजावून सांगत असताना त्याने लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर दोघांनी घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले. तर तुला व तुझ्या नवऱ्याला संपवुन टाकीन, अशी धमकी पिडीत महिलेला दिली.

याबाबत सदर महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तुषार पोपट खेमनर व शिवाजी सयाजी खेमनर (दोघे रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.