अहमदनगर क्राईम

काय सांगता : वीस हजाराचे मागितले सात लाख ‘त्या’महिला सावकारावर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  व्याजाने घेतलेले वीस हजार रुपये एकरकमी परत देवुनही व्याजासह ७ लाख रूपये फिरत आहेत. असे म्हणुन पैसे परत कर असा तगादा लावून पैश्यांची मागणी करत

फिर्यादी महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड तालुक्यातील एका महिला सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चित्रा विश्वनाथ समुद्र ही फिर्यादीत म्हटले आहे की, माझे घरामध्ये मी सोडुन दुसरे कोणीही कमवते नसल्या मुळे मला माझे घरगुती आडचनी कामी पैश्याची अवश्यकता होती

त्यामुळे मी खाजगी सावकार असलेल्या मंगल मोरे या महिलेकडून विस हजार रूपये घेतले होते. त्यानुसार मी २३ फेब्रुवारी २०२० रोजी घेतलेली २०,००० रुपये मुद्दल एकरकमी देवुन टाकली.

अशा पध्तीने मी मंगल मोरे यांचे कडुन घेतलेले २०००० रुपये व्याजासहीत २७ नोव्हेंबर २०२० रोजी परत केले मात्र खाजगी सावकार असलेल्या

मंगल मोरे या महिलेने मला वरील रक्कमेपोटी सदर पैशाचे तुझ्याकडे व्याजासह ७ लाख रूपये फिरत (येणे) आहेत. असे म्हणुन सदर पैसे परत कर असे म्हणत वेळीअवेळी तगादा लावला.

तसेच घरामध्ये काम करित असताना खाजगी सावकार मंगल मोरे हीने घरामध्ये येवुन पैसे दिले नाही म्हणुन शिवीगाळ दमदाट केली. मी तुमचे पैसे परत केले आहेत

मग मला शिवीगाळ का करता असे म्हणाल्याचा राग आल्याने मंगल मोरे हीने मला लाथाबुक्याने मारहान केली व आठ दिवसामध्ये माझे पैसे परत नाही केले तर जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office