अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : विवाहितेला मारहाण करून पळविले त्या सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : संगमनेर येथील न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यासंदर्भात तारखेला आलेल्या विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींसह अन्य तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व जीपमधून पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील डेरे फाटा परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी विवाहितेच्या सासू, सासरा, पती, दिर यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, राजेंद्र दशरथ वाकचौरे (रा. धांदळफळ बुद्रुक) यांची मुलगी पूजा व तिचा नवरा शुभम आनंदा कोल्हे (रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्यात कौटुंबिक वाद आहे.

पूजा हिने संगमनेर न्यायालयात दावा दाखल केला आहे. शनिवार दि. २१ रोजी राजेंद्र वाकचौरे हे मुलगी पूजा हीस कोर्टात घेऊन गेले होते. तसेच शुभम कोल्हे हादेखील कोर्टात आला होता.

कोर्टातील काम संपल्यानंतर राजेंद्र वाकचौरे हे आपली मुलगी पूजा हिच्या सोबत मोटारसायकलवरून धांदरफळ येथे घरी जात होते. यादरम्यान सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास डेरेवाडी फाटा येथे शुभम आनंदा कोल्हे,

ऋत्विक आनंदा कोल्हे, आनंदा महादू कोल्हे, आनंदा यांची पत्नी व इतर तिघे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी राजेंद्र वाकचौरे यांना रस्त्यात अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व पूजा हीस बोलेरो जीपमध्ये बसवून पळवून नेले.

याबाबत राजेंद्र वाकचौरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेचा नवरा, दीर, सासू-सासरे आणि इतर तिघे अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office