अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : निघाले दरोडा टाकायला अन् ७ जणांची टोळी अडकली पोलिसांच्या जाळ्यात !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : निघाले दरोडा टाकायला अन् ७ जणांची टोळी अडकली पोलिसांच्या जाळ्यात. साईनाथ तुकाराम पवार, दिपक रोहिदास गायकवाड, सोमनाथ रामदास गायकवाड, अरुण बाळासाहेब बर्डे, बाळासाहेब उर्फ बाळू लहानू गायकवाड (सर्व रा. कुरणवाडी, बारगाव सुद्रीक, ता. राहुरी),

साईनाथ गजानन काळे (रा. दहिगाव साकत, ता. जि. अ.नगर) व जेरु भगवान भोसले (रा.लोहगाव, ता.पैठण, जि. संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या ७ इसमांची नावे आहेत. पारनेर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

पकडण्यात आलेल्या आरोपींकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी सुरे, सुताची दोरी, मिरची पूड, दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ५० हजार ५७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींकडून पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील ढोकी गावच्या शिवारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ७ जणांची टोळी आल्याची

माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी त्यांना सापळा टाकून जेरबंद केले. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांशी झटापटही केली. मात्र त्यांना गजाआड करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.

साईनाथ तुकाराम काळे याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ५ तर सोमनाथ गायकवाड याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. तसेच साईनाथ काळे याच्याविरुद्धही राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस ठाण्यात पोनि. संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले,

मोतीराम बगाड, पोहेकॉ. संदीप गायकवाड, पोना. गहिनीनाथ यादव, शाम गुजर, पोकॉ. सारंग वाघ, सागर धुमाळ, संपत शिंदे, गोवर्धन जवरे, विजय जाधव, मयूर तोरडमल, गणेश डोंगरे, संतोष मगर, किरण भापकर, रविंद्र पाचारणे,

बाळासाहेब पालवे, देविदास अकोलकर, रविंद्र साठे, मच्छिंद्र खेमनर, विवेक दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. सायबर सेलचे पोकॉ. राहुल गुड्डू, नितीन शिदें, ज्योती काळे यांचेही याकामी विशेष सहकार्य लाभले.

Ahmednagarlive24 Office