अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी नगर येथील एका व्यावसायिकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खुशाल ठारूमल ठक्कर (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जळगाव जिल्ह्यातील महिलेची ठक्करसोबत ओळख होती.
ती महिला विवाहित असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. ठक्कर याने महिलेच्या मुलाला त्याच्या दुकानात काम दिले होते. तसेच त्याने फिर्यादी महिलेला लग्नाचे अमिष दाखविले व त्यांचे कुटुंब नगरमध्ये आणले.
आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तुझ्याशी लग्न करणार नाही, कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही,
अशी धमकी ठक्कर याने पिडीत महिलेला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.