Ahmednagar Crime : जबरदस्तीने गाडीवर बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून चालू गाडीवर तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना दि. १४ मार्च २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील आरोपी रमेश रामदास चव्हाण याने दि. १४ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एका ११ वर्षीय मुलीला बळजबरीने मोटारसायकलव बसवले.

नंतर आरोपीने पिडीत मुलीला घराच्या दिशेने मोटारसायकलवर घेऊन जात असताना चालू गाडीवर पिडीत मुलीचा हात पकडुन अश्लील चाळे केले. तेव्हा मुलीने मोठ्याने ओरडुन चालु मोटारसायकलच्या खाली उडी मारली. त्यानंतर ती रडत घरी पोहचली आणि घरातील लोकांना घडलेला प्रकार सांगीतला.

या प्रकाराबाबत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश रामदास चव्हाण (वय ३५ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा रजि. नं. २७७/ २०२४ नुसार भा.दं.वि. कलम ३६३, ३५४, ३५४ (अ) तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe