Ahmednagar Rape News : कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी रितेश अनिल शेटे याला जन्मठेप तसेच ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद,
भा.दं.वि. ३७६ (२) (ख) अन्वये आरोपी १० वर्षे तसेच ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद. पोस्को अन्वये १० वर्षे तसेच ३ हजर रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अनुसूचित जमाती अत्याचर प्रतिबंध अधिनियम अन्वये जन्मठेप तसेच ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने साधी कैद,
भा.दं.वि. ३६३ अन्वये आरोपी १ वर्षे तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने साधी कैदची शिक्षा सुनावली. या बाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील वीटभट्टीवरून एका पीडित मुलीस पळवून नेत सुपा येथील एका खोलीमध्ये या मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता.
यासाठी दोन जणांनी त्याला मदत केली होती. मुलीस पळवून नेल्या प्रकरणी तिच्या वडिलांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता आरोपी पीडित मुलीस घेवून सुपा येथे असल्याचे माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
चौकशी करताना पीडित मुलीने आरोपीने केलेल्या अत्याचार संदर्भात जबाब दिला. त्यावरुन आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करून श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर गुन्हाची चौकशी येथील जिल्हा न्यायालयात होवून त्यात आरोपी रितेश अनिल शेटे याला विविध कलमान्वये दोषी धरून शिक्षा सुनावली.
यातील दोन आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यात पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदरचे केसमध्ये अतिरिक्त सरकारी वकील अॅड. अनिल एम. घोडके यांनी काम पाहीले. तसेच यातील युक्तीवाद सरकारी वकिल पी.के. कापसे यांनी केले, तसेच त्यांना पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.