Ahmednagar News: सध्या प्रत्येक जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे सोशल मीडिया हा बऱ्याच दृष्टिकोनातून खूप फायद्याचा आणि ज्ञानवर्धक आहे. परंतु जर सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला तर यामुळे नाहक मनस्ताप सहन करण्याची देखील वेळ येऊ शकते.
सोशल मीडियावर बऱ्याचदा आक्षेपार्ह पोस्ट केल्या जातात व यामुळे काही व्यक्ती किंवा व्यक्ती समुदायाची बदनामी होते व अशाप्रसंगी कित्येक जणावर गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरणे घडल्याचे आपण ऐकले असेल.
अगदी याच पद्धतीचे एक प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा बुद्रुक या ठिकाणी घडून आलेले आहे. सोशल मीडियामध्ये पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी माऊली तोडमल याच्यावर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून पोलिसांची बदनामी केली
व त्यानंतर पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांचे फोन आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणामुळे पोलिसांचा स्वाभिमान दुखावल्याची भावना निर्माण झाली व याबाबत पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली व सदरील इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर पोस्ट करून पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सोशल मीडियामध्ये पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी माऊली तोडमल (रा. नेवासा बुद्रुक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात पोस्ट करून पोलिसांची बदनामी केली
सदर पोस्ट केल्यामुळे पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांचे फोन कॉल्स आले. त्यामुळे पोलिसांच्या स्वाभिमान दुखावलेची भावना निर्माण झाली.याबाबत पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे.
वास्तविक पहाता तोडमल यांच्याकडे अशी माहिती होती. त्यांना अनेक संविधानिक मार्ग उपलब्ध होते. पण त्यांनी तसे न करता सोशल मीडियात पोलिसांची बदनामी केली. तोडमल हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
त्यांच्यावर जीव घेणे, गैरकायद्याची मंडळी जमवने, दंगा, दरोडा, आत्महत्येचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांचे हुकुम मोडणे या सारखे छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे.
तसेच (दि.३) जून २०२४ रोजी स्वतःवर देशी कद्यामधून हल्ला झाला म्हणून माऊली तोडमल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान संशयित आरोपी व फिर्यादी तोडमल यांचेच हँडवॉश पोलिसांनी घेऊन तपासणीसाठी पाठवले होते.
याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या विरोधात जनतेमध्ये अ-पप्रचार करणे, पोलिसांची बदनामी होईल, अशा प्रकारची