अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी दोघा माय लेकाला…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी दोघा माय लेकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. याबाबत चार जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की आकाश रमेश शिंदे, वय १८ वर्षे, हा तरुण राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राहत आहे. त्याच्या घराच्या जवळ बंढी लोंढे हा त्याचे कुटंबासह राहतो. तो नेहमीच कशाच्या तरी कारणावरून त्रास देतो.

दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या घटनेतील आरोपी आकाश शिंदे याच्या घराजवळ आले. त्यावेळी आकाश याची आई त्यांना म्हणाल्या, तुमच्याकडे आलेले लोक घाण घाण शिवीगाळ करतात.

त्यांना समजावुन सांगा. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी आकाश याच्या आईला शिवीगाळ करू लागले. तेव्हा आकाश त्यांना म्हणाला, तुम्ही शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने

आरोपींनी आकाश शिंदे व त्याच्या आईला लाथा बुक्क्यांनी व काचेची बाटलीने मला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आकाश याची आईचे गळयातील मनिमंगळसुत्र तुटुन पडुन गहाळ झाले आहे.

आकाश रमेश शिंदे याच्या फिर्यादीवरून आरोपी बंटी लोंढे, अमोल (पुर्ण नाव माहित नाही.) दोघे रा. राहुरी फॉक्टरी, ता. राहुरी तसेच इतर दोन अनोळखी अशा चार जणांवर गून्हा रजि. नं. १२१२ / २०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office