अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा ! गावात तणावाचे वातावरण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम सुरू असताना तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील युवकाने इंस्टाग्रामवर हिंदूंच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा आशयाची पोस्ट ठेवल्याने खळबळ उडाली.

याप्रकरणी घारगाव पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला. अब्दुल गफूर पठाण (बोटा, ता. संगमनेर) या युवकाने आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर मंगळवारी (२३ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.

अमित कुलकर्णी या शेतकरी तरुणाला ही पोस्ट निदर्शनास आली. नागरिकांनी पोस्ट बघितल्याने संताप व्यक्त केला. अमित विजय कुलकर्णी (बोटा) याच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अब्दुल पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला.

Ahmednagarlive24 Office