अहमदनगर क्राईम

आयशर चालकाला मारहाण करून लूटणारे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवरातील आयशर वाहन चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे.

येसगाव येथील राजस्थान ढाब्याजवळ रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशर वाहनाच्या चालकाला मारहाण करून, पोटात चाकू मारून जखमी करून त्याच्याकडील मोबाईल लंपास केला होता.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात 19 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असता तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके

यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागातील रहिवासी असलेला

तरुण समीर उमर कुरेशी (वय 19 वर्ष) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा सोहेल जावेद पठाण (वय 18 वर्षे) व सौरभ रामदास सातोटे( वय 18 वर्ष रा. सुभाष नगर कोपरगाव)

यांच्या सोबत मिळून केला असल्याची माहिती दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरी चे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Ahmednagarlive24 Office