अहमदनगर क्राईम

Ahilyanagar Breaking : दहावीतील विद्यार्थिनीस पिस्तूल डोक्याला लावत बळजबरी अत्याचार, अहमदनगरमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahilyanagar News : अहमदनगरमधील एक माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य समोर आले आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला पळवून नेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही मुलगी श्रीगोंदे तालुक्यातील आहे. आयन इम्तियाज शेख ( १९) असे आरोपीचे नाव आहे.

या आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे येथे मुलीस पळवून नेले व तेथे अत्याचार केल्याचे समोर आले असून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घटनेची समजलेली अधिक माहिती अशी : पीडित मुलीच्या आईने श्रीगोंदे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित ही दहावीत शिकत असून तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ती शिक्षणासाठी मामाकडे राहत असून सध्या बेलवंडी येथील विद्यालयात तिची दहावीची परीक्षा असल्याने ते पेपरला जात होती. मामाच्या गावावरून पेपरसाठी ती यायची. २६ मार्च रोजी बेलवंडी येथे ती आलेली असताना आरोपी आयन शेख याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले.

परंतु त्या मुलीने त्यास नकार दिला असता आरोपीने मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला. पिस्तुलाने गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी देत बळजबरीने शिरुर (जि. पुणे) येथे घेऊन गेला. तेथून ते बसने पुण्याला पुण्यातील एका लॉजवर पोहोचले व तेथे रात्री त्याने तिच्यावर अत्याचार केला. २८ मार्चला ते नारायणगाव (ता. जुन्नर, पुणे) येथील मुलाच्या आजीच्या घरी गेले असता त्या आजीने दोघांना बेलवंडी पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर वरील घटनेचा उलगडा झाला. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office