अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील एका ४७ वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून ५ वर्ष अत्याचार करणारा निवृत्त शिक्षक वेणूनाथ वामन ठोंबरे (वय ५८, इंदिरानगर) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
ठोंबरेने पत्नी आजारी असल्याचे भासवत विधवा महिलेला आमिषे दाखवून अत्याचार केले. मात्र नंतर लग्नास नकार दिला.
सांगितलेल्या सर्व घटना खोट्या निघाल्या. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने शहर पोलिसात तक्रार दिली.
ठोंबरेला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.