अहमदनगर क्राईम

Ahmednagar Breaking ! माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळीविरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र…

Published by
Ahmednagarlive24 Office

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळी विरोधात ‘मोक्का’ कलमानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मुंबई यांची परवानगी मिळाली आहे.

१३ मार्चपर्यंत दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्याची मुदत असून त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुहुँ, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, अरूण अशोक पवार, राजु भास्कर फुलारी यांचा यामध्ये समावेश आहे.

या टोळीने सावेडी उपनगरातील एकविरा चौकात १५ जुलै २०२३ च्या रात्री अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ‘मोक्का’चे वाढीव कलम लावण्यात आल्यानंतर उपअधीक्षक भारती यांनी तपास करून पुरवणी दोषारोपपत्र तयार केले.

ते विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यासाठी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांची परवानगी आवश्यक असते. त्यांनी परवानगी दिल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office