अहमदनगर क्राईम

अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून आर्थिक फसवणूक !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-सोशल मीडियातून ओळख निर्माण करत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघड आली आहे.

कर्जत तालुक्यातील राशीन येथे नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांची ही फसवणूक झाली असून याबाबत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुलकुमार श्रीधर राऊत (मुळगाव गडहिंग्लज,कोल्हापुर) सध्या नोकरीनिमित्त (रा.राशीन ता. कर्जत) यांना राहुल नामदेव कवाडे (रा.आवळे बुद्रुक ता.राधानगरी जि. कोल्हापुर) याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती.

त्यानंतर ती रिक्वेस्ट स्वीकारून दोघांची मैत्री झाली व बोलणे सुरू झाले. मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने फिर्यादिस ‘मी ट्रेडिंग सुरू केले असुन कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा.

१ लाखाला प्रतिदिवसाला मी ५ हजार देतोय आणि रक्कम जेव्हा परत हवी असेल तर लगेच माघारी देखील देतोय’ असे सांगुन मोबाईलवर बँक अकाऊंटबाबतची माहिती पाठवली.’तुम्ही २ लाख ३० हजार गुंतवा, मी दररोज २० हजार तुम्हाला देत जाईल व जेंव्हा सर्व रक्कम लागेल तेव्हा परत करेल मी कुणालाही फसवले नाही’ असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

शेअर मार्केटचे अनेक कोर्स मी केलेले असून अनेक अधिकाऱ्यांनीही माझ्याकडे गुंतवणुक केलेली आहे’ यावर विश्वास ठेवत फिर्यादीने दि.३० ऑक्टोबर २०२१ रोजी ४० हजार, दि.१ नोव्हेंबर २०२१ रोजी १ लाख १० हजार तर दि.२ नोव्हेंबर २०२१ रोजी ८० हजार असे एकूण २ लाख ३० हजार रक्कम स्वतःच्या व आईच्या खात्यावरून आरोपीच्या एच.डी.एफ.सी बँक खात्यात ट्रान्सफर केली.

त्यानंतर कवडे याने मोबदला म्हणुन फिर्यादीच्या आईच्या खात्यावर दि.२ नोव्हेंबर रोजी १२ हजार व दि.३ नोव्हेंबरला २० हजार तर दि.८ नोव्हेंबर रोजी २० हजार असे तीन वेळा ५२ हजार रुपये दिले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास विलंब करून ‘मी शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी पुण्याला जाणार आहे,वडिलांची तब्बेत खराब आहे’ अशी कारणे देत मोबदला दिला नाही.

त्यानंतर फिर्यादीने गुंतवलेली २ लाख ३० हजार रक्कम परत मागितली असता ‘आज-उद्या देतो’ करत फिर्यादीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.व त्यानंतर आरोपीने दि.११ नोव्हेबर रोजी ५० हजार तर दुसऱ्या दिवशी १ लाख असे एकुण १ लाख ५० हजार पाठवले.गुंतवणुकीचे ८० हजार आणि नफ्याचे दि.८ नोव्हे.

नंतरचे २० प्रमाणे येणे बाकी होते. फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने हा सर्व प्रकार आरोपी कवडे याच्या पत्नीस फोन कॉलवर सांगितला. दि.१३ नोव्हे रोजी कवडे याने फिर्यादीच्या व्हाट्सअपवर चुकीच्या पद्धतीने मेसेज केले.यापुर्वीही फिर्यादीने गुंतवणुकीचे पैसे मागितले असता

‘मी आत्महत्या करतो आणि सुसाईड नोटवर तुझे नाव लिहितो, पुन्हा मला व माझ्या बायकोला कॉल केला तर खोटा गुन्हा दाखल करून फसवतो ‘अशी धमकी दिली आहे. कर्जत पोलिसांनी आरोपी राहुल कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office