Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून निर्घृण खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाखाली पुरला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : युवकाचे अपहरण करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडांखाली पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महेश ऊर्फ दहिष्या नर्गीषा काळे (वय ३०) असे मृताचे नाव आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील राजीव गांधीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या तिघांनी हे कृत्य केल्याची माहिती समजली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन आरोर्पीना अटक केली आहे.

याबाबत नितीन नर्गिशा काळे (वय ४०, रा. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १८ रोजी पहाटे चारच्या सुमारास तुषार ऊर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे (सर्व रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी) यांनी भाऊ महेश याचे मोटरसायकलवरून अपहरण केल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी तुषार काळे यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण महेश नर्गिशा काळे यास मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी यास मारहाण करून त्याचा खून मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडांच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवल्याची कबुली दिली.

यानंतर कर्जत पोलिस आरोपीला घेऊन जवळे येथे गेले. पोलीस निरीक्षक मारुती मुळक, जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी व काही पंचांसमक्ष आरोपीने मृतदेह पुरून ठेवल्याचे ठिकाण दाखवले. पोलिसांनी पुरलेला मृतदेह वर काढला व शुक्रवारी (दि. १९) सकाळी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तलाश ऊर्फ तुषार शिवा काळे व गौरी तलाश ऊर्फ न तुषार काळे यांना अटक केली असून, अश्विनी शिवा काळे मी फरार आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe