अहमदनगर क्राईम

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ राजकीय व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला एक राजकीय व्यक्ती व फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी आरोपी राजकीय व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या राजकीय व्यक्ती विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादी महिला व तो आरोपी राजकीय व्यक्ती यांचा बनावट अश्लिल व्हिडीओ मोरया युवा प्रतिष्ठान ग्रुपवर व इमामपुर नगर तालुका

येथील वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तसेच आरोपी राजकीय व्यक्ती याच्या नातेवाईक व मित्र यांना पाठवुन त्याची व कुंटुबाची समाजामध्ये प्रतिमा मलीन केली असुन

राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचे कट कारस्थान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office