अहमदनगर क्राईम

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळला ! परिसरात खळबळ…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे.

तिच्या वडिलांनी मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.(Ahmednagar Breaking: Rotten body of minor girl found)

याबाबत सविस्तर वृत्त असे कि श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात या मुळीचा मृतदेह आढळला आहे उशिराने या मुलीचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला.

सदरचा मृतदेह कुजलेला असल्याने दुर्गंधी सुटलेली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची मुलगी ही गावातीलच असल्याची ओळख पटली. ती 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली होती, असे सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील रिंगमुळे तिच्या वडिलांनी तिला ओखळले.

या तळ्याजवळ एका पुरुषाचा गॉगल आढळून आला आहे. तसेच तिचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा घातपात झाला असून तिला मारुन टाकण्यात आले असल्याचे सांगितले.

Ahmednagarlive24 Office