अहमदनगर क्राईम

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबार करणाऱ्या आरोपीस परजिल्ह्यातून अटक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यातील निंबोडी येथील शेतकऱ्याची शेळी चोरुन घेवुन चोरटे पळून जात होते. यावेळी चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता.

यामध्ये दोन शेतकरी गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या चोरट्यांचाच शोध घेत असताना पोलिसांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, सदरचा प्रकार हा अमऱ्या दत्तु पवार व करण पंच्याहत्तर काळे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा पोलीसांनी शोध घेऊन अमऱ्या उर्फ अमर दत्तु पवार हा नळी व़डगाव ता. भुम जि. उस्मानाबाद येथे येथून मोठ्या शिताफीने अटक केले.

त्यावेळी करण पंच्याहत्तर काळे पोलीसांना गुंगारा देवुन पळुन जाण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासुन तो अद्यापपर्यंत फरार होता.

दरम्यान करण पंच्याहत्तर काळे हा पाथरुड ता. भुम जि. उस्मानाबाद येथे येणार असलेबाबत गोपनिय बातमीदाराकडुन पोलीसांना माहिती मिळाल्याने कर्जत पोलिसांनी काळे याचा शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींवर कर्जत, नगर, भूम, सातारा या ठिकाणी जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने शेतकऱ्यांनी पकडल्याने गोळीबार केल्याचे कबूल केले आहे.

Ahmednagarlive24 Office