अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना परिसरात असणाऱ्या पाटाच्या वाहत्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळी अशोक कारखाना नजीक पाटातील पाण्यात तरुणाचा मृतडे काही ग्रामस्थांना दिसून आला.त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह श्रीरामुरातुन अशोकनगरला वाहत आला कि नेमके कोठुन आला ? याचा शोध पोलीस करीत आहे.