अहमदनगर क्राईम

Ahmednagar Breaking : तरुणाचा मृतदेह आढळला ! एकच खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बाजार तळातील एका शेडमध्ये आज शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी एक तरुणाचा मृतदेह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.(Ahmednagar Breaking: Youth’s body found)

बाजारतळावर तरुणाचा मृतदेह दिसून येताच परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस पाटील तालुका पोलिसांना याबाबत कळविले असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करून अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान तरुणाची ओळख पटली असून शरद रंगनाथ घुमरे (वय 32 वर्षे राहणार सांगवी-सोमठाण ता.सिन्नर जि.नाशिक येथील आहे.

याबाबत ज्ञानेश्वर रंगनाथ घुमरे (वय 45 वर्षे( यांच्या खबरी वरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान शरदचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप बोठे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24