अहमदनगर Live24 टीम, 17 ऑक्टोबर 2021, Ahmednagar Crime : शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील 55 वर्षीय शेतकर्याने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.15) रात्री घडली.
हा प्रकार एका महिलेसमवेतच्या फोटोवरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकारातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संभाजी साहेबराव खरड असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी भाऊराव उर्फ मधुकर पोपट वाघमारे, शरद अण्णा वाघमारे, कैलास रतन वाघमारे (सर्व रा.देवटाकळी) या तिघा विरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत त्याचा मुलगा महेश खरड यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, संभाजी खरड यांना मागील तीन महिन्यापासून त्यांचे एका महिलेबरोबर एकत्र काढलेले फोटो दाखवून त्यांना वारंवार ब्लकमेल करून पैशाची मागणी केली जात होती.
त्यांनी संशयित तिघांना काही पैसे दिले. व यापुढे माझी बदनामी करू नका असे सांगून प्रकरण थांबविण्यास सांगितले. मात्र त्यानंतर ही पैशांची मागणी सुरू राहिली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती.
15 ऑक्टोंबरला दुपारी 1 च्या संशयितांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांसमोर पैशांची मागणी करून पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यातूनच त्यांनी घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेवगाव पोलिसांनी संशयित तिघा विरुद्ध भादवी कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.