अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला अटक !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime : कोपरगाव शहर परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत टोळीला कोपरगाव बेट व अंबिकानगर येथून अटक केली. शहर पोलिसांनी कोपरगाव हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून ५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगावातील साई नक्षत्र हाईटस, जुना टाकळी रोडसमोरील आजिक्य लक्ष्मण कदम (वय २७) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन घरातुन ६० हजाराचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने,

१४ हजार रोख रक्कम, ४ हजार रुपये किंमतीची चांदी, असे एकुण ७८ हजाराचा एकुण मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर फिर्यादीवरुन ५ ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

त्यानुसार दाखल गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोपरगाव शहर पोलीस पथकाने संशयीत आरोपी शुभम भागवत शिर्के (रा. ब्रिजलालनगर, कोपरगाव) यास तपासकामी ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता,

त्याने त्याचा साथीदार महेश मोहन सोनवणे (रा. बेट कोपरगाव), ओमकार नितीन नागरे (रा. अंबिकानगर, कोपरगाव) याच्या मदतीने कोपरगाव शहरात वेगवेळ्या ठिकाणी घरफोड्या व चोरी केल्याचे कबुली देवुन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल काढुन दिला.

तसेच त्यांनी विक्री केलेला काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात दोन लाखाची यामाहा मोटारसायकल, १ लाख ६० हजार किंमतीच्या दोन प्लॅटिना, ४ हजाराची चांदी, त्यात ३ चांदीचे शिक्के, २ चांदीच्या अंगठ्या,

१ चांदीचा दिवा, ५२ हजार रुपयांचे विविध कंपन्याचे मोबाईल ४५ हजाराचे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, ३० हजाराचे १० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २१ हजाराचे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, असा एकूण ५ लाख २ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी शुभम भागवत शिर्के, महेश मोहन सोनवणे, ओमकार नितीन नागरे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत केलेले सहा गुन्हे उघडकीस आणले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख, उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, भरत दाते यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल तिकोणे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office