अहमदनगर क्राईम

ठेवीदारांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या ‘त्या’ पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्ता होणार जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने ठेवीदारांच्या दोन कोटीहून अधिक रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली आहे.

पाच संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश नगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहेत. या आदेशाने परीसरात खळबळ उडाली आहे.

व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना जादा रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या परंतु त्या परत केल्या नाहीत.

या तक्रारीवरून अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. या संचालक मंडळाच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने ठेवीदारांचे पैसे मुदतीनंतर परत केले नाही. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक अभय शांतीलाल चंगेडिया, आनंद अशोकलाल भळगट , तेजकुमार हिरालाल गुंदेचा, गोपाल रुपचंद कडेल व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर यांची मालमत्ता जप्त केल्याचे आदेश पारित केलेले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24