अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यासह नगर शहरात देखील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरीक देखील दहशतीखाली वावरू लागले आहे.
नुकतेच शहरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना चारचाकी वाहनांची भुरळ पडली आहे. नगर शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना आता चारचाकी वाहने चोरीला जात आहेत.
एकाच रात्री दोन कार चोरीला गेल्याप्रकरणी येथील कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिली घटना…
याबाबत अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद रोडवरील दसरेनगरमधून घरासमोर उभी केलेली पाच लाख रूपये किंमतीची कार (एमएच 14 एफएस 1750) चोरीला गेली.
मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी लक्ष्मण नाथू माघाडे (रा. दसरेनगर) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना… केडगावमधील भूषणनगरमधील अनिल बन्सी बारगळ यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची कार (एमएच 16 सीव्ही 6060) उभी केली होती.
मंगळवारी रात्री 10 ते बुधवारी सकाळी सहा या वेळत अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहे.