Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे.
या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार
या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे.
यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.