Ahmednagar News : अहमदनगरमधील बांधकाम व्यावसायिकावर चाकूने वार करत ५० लाख लांबवले ! आरोपी सापडेना, मित्राचेच कृत्य ?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar News :  अहमदनगरमधील बांधकाम व्यावसायिकावर चाकूहल्ला करत त्यांच्याकडील ५० लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाला. या घटनेचा पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच या प्रकरणातील ५० लाखांचाही हिशेब मिळालेला नाही.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वडगाव गुप्ता येथील बांधकाम व्यावसायिक अशोक श्रीधर शेळके यांच्यावर व्यवहाराच्या वादातून चाकूहल्ला करण्यात आला होता.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात निखिल शिवाजी गांगर्डे (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ५० हजारांहून अधिक रक्कम बाळगता येत नाही. असे असताना शेळके शेळके यांच्याकडे ५० लाख रुपयांची रोकड कुठून आली. त्याचा हिशेब त्यांनी अद्याप पोलिसांना दिलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान फिर्यादी यांचे वडील अशोक श्रीधर शेळके यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी चाकूहल्ला करून आरोपी ५० लाख रुपये घेऊन पसार झाला असल्याचे जबाबात म्हटले आहे. रकमेचे विवरण मिळालेले नाही. त्यांच्या प्रकृती झाल्यानंतर विवरण घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मित्राचेच कृत्य ?
दरम्यान या घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत. लवकरच आरोपी कोण आहे याबाबत माहिती समोर येईल. परंतु हे कृत्य त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने केले असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe