Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील सहा जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने पोलिसांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे.
अनिल सिताराम फुंदे याने गोरक्ष शिरसाट, सतीश शिरसाट व शोभा शिरसाट यांच्याविरुद्ध जेसीबी अडवून चावी काढून घेतली, अशी तक्रार दाखल केली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबविल्याप्रकरणी
अनिल फुंदे, सरपंच पांडुरंग शिरसाट, मारुती धर्मराज आघाव, रघुनाथ गहिनीनाथ शिरसाट, कुंडलिक गहिनीनाथ शिरसाट, नागेश नवनाथ शिरसाट, सिताराम नामदेव फुंदे यांनी मारहाण, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव टप्पा गावचे शिवारात गौरव दामोदर शिरसाठ खोटे यांचे शेतात जेसीबीचे साह्याने विठ्ठल रामकिसन शिरसाट यांचे पाईपलाईनचे काम करत असताना गोरक्ष शिरसाट, शोभा शिरसाट व नितीन त्रिंबक शिरसाट यांनी
अनिल फुंदे यांना तू आमच्या शेतात जेसीबी का घातला, असे म्हणून जेसीबीची चावी फुंदे यांच्या खिशातून बळजबरीने काढून घेऊन जेसीबी त्याचे ताब्यात घेतला आहे. फुंदे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच जिवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली,
अशी तक्रार दिली. यावेळी तक्रार देण्यासाठी गोरक्ष शिरसाट पोलिस ठाण्याच्या आवारात आले. तेथे गोरक्ष शिरसाट, अनिल फुंदे, सिताराम फुंदे, नितीन शिरसाट, सतीश शिरसाट, सिताराम नामदेव फुंदे, बाळू सिताराम फुंदे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात हाणामारी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश मुलगीर,
उपनिरीक्षक सचिन लिमकर, सुहास गायकवाड, चंद्रावती शिंदे यांनी हाणामारी सोडविली. पोलिस कर्मचारी चंद्रावती शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना ताब्यात घेतले आहे.