अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : नगर आहे की बिहार? भाजपच्या बूथजवळ थांबला म्हणून टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर शहरातील गुंडागर्दीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. नगर शहरातील टोळीयुद्धाच्या काही घटना ताजा असतानाच आता शहराजवळील बोल्हेगाव भागात १० ते ११ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले.

धक्कादायक म्हणजे भाजपच्या बूथजवळ थांबला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे समजले. याप्रकरणी १६ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहराजवळील बोल्हेगाव भागात शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घटना घटली. दरम्यान पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत चेतन चेतन संतोष सरोदे (वय १८, रा. भीम चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राजवळील भारतीय जनता पार्टीचे बूथजवळ थांबलेला असल्याचे कारणावरून १८ मे रोजी रात्री १०.३० वाजता १० ते ११ जणांनी मारहाण केली.

याप्रकरणी सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदेश किसन भिंगारदिवे, संकेत किसन भिंगारदिवे, जमीर पठाण, सोन्या लांडगे, रोहित जाधव, पंकज दराडे व त्यांचेसोबत असलेले इतर अनोळखी ४ ते ५ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ते ११ जणांनी सरोदे यांना लाकडी दांडके, कोयत्याने मारहाण केली.

दुसऱ्या घटनेत आदेश किसन भिंगारदिवे (वय २०, रा. गांधी नगर, भिंगारदिवे मळा) यांनी फिर्याद दिली आहे. पंकज मच्छिंद्र दराडे याला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने दराडे याच्यासह त्याचे मित्र आशिष विठ्ठल शिरसाठ, चेतन संतोष सरोदे, योगेश संतोष सरोदे, शारुन दाऊद जाधव, यश रावसाहेब शिरसाठ यांनी मारहाण केली.

दराडेसह मित्रांना मारहाण का केली, अशी विचारणा करत सहा जणांनी फिर्यादी आदेश भिंगारदिवे व त्याच्या मित्रांना मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातही आरोपींनी लाकडे दांडके, कोयत्याचा वापर केला आहे.

शहरात मारहाणीचे प्रकार वाढले
नगर शहरात मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. मागील हप्त्यात भर बाजारात एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती तर त्याआधी निवडणुकीच्या आदल्या दिवशी देखील असेच टोळीयुद्ध पाहायला मिळाले होते. त्यामुळे शहरातील वाढत्या गुंडागर्दीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office