अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : प्रेमसंबंधात वितुष्ट आले, नराधम महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर करत राहिला अत्याचार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत.

आता आणखी एक अत्याचारासंदर्भात घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची माहिती समोर आलीये. अभिषेक वसंत कनगरे या आरोपीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी : कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेल्या अभिषेक वसंत कनगरे याने येवला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या १९ वर्षीय युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी सदर तरुणीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुणी ही मूळ श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून ती येवला तालुक्यात शिक्षण घेत आहे. तिची अभिषेक वसंत कनगरे याच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यातून त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते.

मात्र त्यात नंतर वितष्ट आले होते. तरीही त्याने सदर तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. अशा आशयाची फिर्याद तरूणीने कोपरगाव पोलिसांत गुरुवारी दाखल केली. यावरून अभिषेक कनगरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मयूर भामरे हे करीत आहेत.

महिलांवरील अत्याचारसंदर्भात कडक कारवाई व्हायला हवी, कायदेही तसे कडक व्हायला हवेत अशी मागणी समाजातून होत आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा मोठा बंदोबस्त करून अशा प्रवृत्ती समाजातून ठेचून काढल्या पाहिजेत अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office