अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : ‘तो’ ओरडत राहिला अन हा दगडाने ठेचत राहिला.. अहमदनगरमधील ‘त्या’ हादरवणाऱ्या खुनाचा उलगडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मला पाजी म्हणू नको, असे म्हटल्यानंतर दुसऱ्याने पाजी म्हटलो तर काय होईल, असे म्हटल्याचा राग आल्याने एकाने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार नगरमध्ये घडला आहे.

याबाबत समजलेली अधिक हकीकत अशी की, विश्वास डांगे यांच्या काटबन खंडोबा ते आगरकर मळाकडे जाणाऱ्या रोडवर पत्र्याच्या खोल्या आहेत. त्या भाडोत्री दिलेल्या आहेत. एका खोलीत प्रमोद विश्वकर्मा हा मजूर राहतो तर दुसऱ्या एका खोलीत परमात्माराम सुदर्शनराव हा राहतो व त्याच्या बाजूला अशोककुमार अमरजित हा राहतो.

रात्री ११.४५ च्या सुमारास मालक विश्वास डांगे यांना फोन आला की, तुमच्या खोलीत राहणाऱ्या एका मजूराने दुसऱ्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली आहे. तेव्हा डांगे हे घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना समजले की, परमात्माराम आणि अशोककुमार असे दोघे बाहेर उभे असताना प्रमोद हा त्या ठिकाणी आला.

अशोककुमार त्याला म्हणाला की. कहा जा रहा है पाजी. असे म्हणत त्याला अडवले. त्यानंतर प्रमोद हा त्यास बोलला की, मुझे पाजी नही बोलना. तेव्हा अशोक बोलला की, क्या हुआ फिर तुझे पाजी बोला तो. तेव्हा प्रमोद व अशोककुमार यांच्यात शाब्दीक वाद होवून शिवीगाळ, धक्काबुक्की झाली.

त्यानंतर त्यांचे भांडण परमात्माराम याने सोडवले. त्यानंतर प्रमोद तेथून पुढे निघून गेला. परमात्माराम खोलीत आल्यावर त्याला पुन्हा मोठ्याने आवाज आला म्हणून तो बाहेर आला असता प्रमोद विश्वकर्मा हा अशोककुमार याच्या डोक्यात हातातील दगडाने जोरजोराने मारत होता.

त्यावेळी आपण मोठयाने ओरडत तिकडे गेल्यानंतर प्रमोद हा दगड तेथेच फेकून पळून गेला. या मारहाणीत अशोक्कुमारचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रमोद दिपचंद विश्वकर्मा, रा.बांकी शेजवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश याच्या विरूद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत

Ahmednagarlive24 Office