अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह दीर व सासू विरुद्व गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या काळ बदलला आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे असे आपण म्हणतो, परंतु आजही घरातील चैनेच्या किंवा कर्ज किंवा इतर कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तीला चक्क घरातून बाहेर हाकलून देण्यात आल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीसह दीर व सासू अशा तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जयश्री नवनाथ धनवडे (वय ३७ वर्षे, रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी, हल्ली रा. अकोळनेर, ता. जि. अहमदनगर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे, की जयश्री धनवडे यांचे लग्न दि.२८ नोव्हेंबर २००४ रोजी नवनाथ बुधाजी धनवटे (रा. जोगेश्वरी आखाडा, ता.राहुरी) यांच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी जयश्री धनवडे यांना सहा ते सात महिने चांगले नांदवले.

त्यानंतर टेम्पो घेण्यासाठी जयश्री धनवडे यांनी माहेरहून पैसे आणावेत म्हणून छळ करु लागले. तेव्हा जयश्री धनवडे यांनी त्यांच्या आईकडून १ लाख ८० हजार रुपये दिले होते. त्यानंतर दोन तीन महिन्यांनी पैशासाठी पुन्हा जयश्री धनवडे यांचा छळ सुरूकेला. सन २०१८ मध्ये जयश्री धनवडे यांनी विविध फायनान्स कंपन्यांचे दोन लाख रूपए कर्ज काढून पती व सासूला दिले. त्यानंतर त्या कर्जाची परत फेड करण्यासाठी हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून जयश्री धनवडे यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

त्यानंतर दि. २२ मे २०२४ रोजी पती- नवनाथ धनवटे हा म्हणाला की, तु तुझ्या आईच्या पेंशनवर परत ५ लाख रुपये कर्ज काढ. तेव्हा जयश्री धनवडे यांनी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करुन लाथांबुक्यानी मारहाण केली. आणि तु तुझ्या आईकडुन ५ लाख रुपये घेवुन आल्यावर आमच्या घरी नांदवयास यायचे. नाहीतर नांदवयांस यायचे नाही.असे म्हणुन त्यांनी जयश्री धनवडे यांना घराच्या बाहेर हाकलून दिले.

जयश्री नवनाथ धनवडे यांच्या फिर्यादीवरून पती नवनाथ बुधाजी धनवटे, दिर अनिल धनवटे, सासु-लक्ष्मीबाई धनवटे (रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office