अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीस पळवले; भिंगारमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या नगर शहरासह जिल्ह्यात महिलांचा विविध कारणासाठी शारीरिक मानसिक छळ, मारहाण तसेच अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना देखील वाढत आहेत.

या वाढत असलेल्या घटनांमुळे पालक वर्गात चांगलीच घबराट पसरली आहे. नुकतीच घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना भिंगारमध्ये बुधवारी (दि.१९) सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकाच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सदर मुलीचे पालक हे खाजगी नोकरी करतात. ते बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कामावर गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही कामानिमित्त बाहेर गेलेले होते.

त्या वेळी त्यांची १७ वर्षीय मुलगी एकटीच घरी होती. घरात कोणीच नसल्याने सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने तिला कशाची तरी फूस लावून पळवून नेले.

दरम्यान दुपारी कुटुंबीय घरी आल्यावर त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही, त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला. तसेच तिच्या मैत्रिणकडे विचारणा केली असता काहीही माहिती भेटली नसुन ती कोठेही मिळुन आली नाही.

त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office