Ahmednagar News : नराधम रिक्षाचालकाने विद्यार्थिनीला काटवनात ओढत नेले, दुसरी ओरडत राहिली..

Crime News

Ahmednagar News : कोपरगावमध्ये एका ठिकाणी नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोपरगाव येथील एका हॉस्पिटल येथे पीडित व तिची मैत्रीण नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. त्या नेहमीप्रमाणे सोमवार दि.२ एप्रिल रोजी दिवसभर क्लास करून सायंकाळी सात वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून सायंकाळी साडेसातच्या दरम्यान शिर्डी निमगावकडे घरी निघाल्या होत्या.

तेथे रिक्षा घेऊन उभ्या असलेल्या आरोपी अरबाज रमजान शेख (रा. श्रीरामनगर, शिर्डी) यास पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीने त्यास शिर्डीला जाणार आहे का? असे विचारले असता तो हो म्हणाला व त्याने त्या दोन मुलींना आपल्या रिक्षात बसवले. आरोपी अरबाज याने शिर्डीकडे रिक्षा न घेता नागपूर हायवेच्या दिशेने चालवण्यास सुरुवात केली. त्या मुलींनी इकडे कोठे रिक्षा चालवली आम्हाला निमगावला घरी जायचं आहे असे त्यास म्हणाल्या

मात्र त्याने काही एक न बोलतां रिक्षा सुसाट वेगाने चालवून घेत एक दीड किलो मीटर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या काटवनानजीक रिक्षा थांबवली. त्यानंतर त्या दोघी पैकी फिर्यादी मुलीचा हात धरून कटवणाकडे ओढत नेऊ लागला. हे दृश्य पाहून दुसरी मुलगी जोरजोरात ओरडायला लागली. तिच्या ओरडण्यामुळे तेथून ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या नजरेस हा प्रकार दिसला व त्याने विचारणा केली असता ओरडत असलेल्या मुलीने रिक्षा चालक आपल्या मैत्रिणीस ओडत घेऊन जात असल्याचे सांगितले.

तोपर्यंत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली. जमावाने त्या मुलीला आरोपीच्या ताब्यातून सोडवत कोपरगाव पोलिसांना या घटनेची माहिती कळवली.
माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याची गाडी तात्काळ दाखल होऊन काटवनात लपलेल्या आरोपी अरबाज यास शिताफीने पकडून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन आरोपी अरबाज रमजान शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe