Ahmednagar News : प्रवरा नदीपात्रात आढळून आलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ कायम

Pragati
Published:

Ahmednagar News : प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी आलेल्या आपत्ती व्यवस्थापनच्या पाच अधिकऱ्यांसह एक स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोहायला गेलेल्या तिघांपैकी एका शाळकरी विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परत प्रवरा नदीपात्रात एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत शनिवार दि. १ जुन रोजी अकोले शहरातीलशेकईवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला होता. अकोले पोलिसांच्या माहितीनुसार हा इसम हा ४० ते ४५ वयोगटातील असून त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅट आहे. रंगाने सावळा तर चेहरा गोल आहे.

त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ ओम चिन्ह गोंदण गोंदलेले आहे. अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी असल्याने त्यांचा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. या अनोळखी इसमाच्या मृतदेहाबाबत अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केलीआहे. या मृतदेहाची ओळख पटली नसून नातेवाईक अथवा ओळखीचे कोणी असेल तर त्यांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News