Ahmednagar News : बियाणे व खातांसाठी आणलेल्या पैश्यावर चोरट्यांचा डल्ला ; पैसे तर नेलेच सोबत वृद्ध दाम्पत्यास …

Pragati
Published:

Ahmednagar News : अज्ञात चार चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला झोपेतून उठवत बेदम मारहाण करत त्यांनी दवाखाना खर्चासाठी तसेच शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते घेण्यासाठी बँकेतून काढुन आणलेले ५० हजार रुपये, तसेच गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील कर्णफुले, कुडके ऐवज बळजबरीने चोरून नेला.

यात चोरट्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत सुगंधा कडूस व त्यांचे पती कुंडलिक कडूस हे जखमी झाले आहेत. ही घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील दरेमळा येथे घडली.

कडूस यांची नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील दरेमळा परिसरात डोंगराच्या कडेला एकांत वस्ती आहे. तेथे दोघे पती पत्नीच गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकरी पेरणी करण्यासाठी बियाणे व खातांची जुळवाजुळव करत आहेत.

कुंडलिक कडूस यांनी देखील दवाखाना खर्चासाठी तसेच शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते घेण्यासाठी आदल्या दिवशी दुपारी गावातील बँकेतून ५० हजार रुपये काढुन आणले होते. दरम्यान मंगळवारी रात्री ते जेवण करून घराचा दरवाजा बंद करून हे दाम्पत्य झोपले मात्र पहाटे एकच्या सुमारास अनोळखी तीन ते चार चोरटे त्यांच्या वस्तीवर आले.

त्यांनी कडूस यांना आवाज देत दरवाजा वाजवून उठवले. एवढ्या रात्रीच्या वेळी कोण हाक मारत आहे, हे पाहण्यासाठी फिर्यादी सुगंधा कडूस यांनी दरवाजा उघडला असता अचानक अनोळखी ३-४ चोरटे घरात घुसले. त्यांनी सुगंधा व त्यांचे पती कुंडलिक कडूस यांना दमबाजी करत मारहाण बेदम केली. तसेच घरातील पैसे व दागिने काढुन देण्यासाठी धमकावले.

चोरट्यांच्या मारहाणीच्या भीतीने त्यांनी आदल्या दिवशी दुपारी गावातील बँकेतून दवाखाना खर्चासाठी तसेच शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते घेण्यासाठी काढुन आणलेले ५० हजार रुपये, तसेच सुगंधा कडूस यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील कर्णफुले, कुडके हे दागिने असा ९३ हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.

चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत . या घटनेची माहिती मिळाताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत सुगंधा कडूस यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात तीन ते चार चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe