Ahmednagar News : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत युवकाचा मृत्यू ; एकजण गंभीर

Pragati
Published:
accident

Ahmednagar News : वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.हि घटना भंडारदरा तालुक्यातील चिचोंडी येथे घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारदऱ्याच्या रिंगरोडला सिमेंटीकरणाचे काम सध्या चालु असून, त्या ठिकाणाहुन वाळू खाली केल्यानंतर परत माघारी फिरत असताना चिचोंडी गावाजवळ (एम.एच. १५ जे.क्यु. ४५५५) क्रमांकाच्या रिकाम्या डंपरने एका दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली.

या धडकेमध्ये चिचोंडी येथील संतोष किसन मध्ये हा युवक जागीच ठार झाला असून सचिन तुकाराम मध्ये हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मयत झालेला संतोष हा काही काळ गाडीच्या टायरखाली पडून होता. अपघात झाल्यानंतर सदर डंपरचा चालक हा पळून गेला असून डंपर राजूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सचिन शिंदे, दिलीप डगळे, अशोक काळे हे पुढील तपास करीत आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe