अहमदनगर क्राईम

व्यापारी गौतम हिरण खून प्रकरणी विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते.

त्यानंतर दि. 7 मार्च 2021 रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर गौतम हिरण यांचा पैशासाठी अपहरण करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी अल्पावधीतच गुन्हेगारांना जेरबंद केले.

या प्रकरणात एकंदर पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्याने ऍड उमेशचंद्र यादव-पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश आज जारी केला आहे.

Ahmednagarlive24 Office