अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- अन्न आणि औषध प्रशासनाने प्रतिबंधित हिरा पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्यास शिर्डीतून ताब्यात घेतले.
आशिष अशोकलाल खाबिया (वय-30) रा.गोवर्धन नगर शिर्डी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आशिष हा अनेक दिवसांपासून चोरून गुटखा साठवून त्याची विक्री करीत असल्याची तक्रार अन्न आणि औषध खात्याला होती.
त्यानुसार आशिषच्या घरी अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकत मुद्देमाल जप्त केला. याबाबत आरोपी आशिष खाबिया यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने संबंधित ठिकाणाहून अन्नपदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. यावेळी अन्नपदार्थाचे नाव जप्त साठा एकूण किंमत 1 हिरा पानमसाला 80 पुडे 9 हजार 500 व केटरॉयल 717 तंबाखू 80 पुडे 2 हजार 400 अशी एकूण 12 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आशिष खाबिया यास अटक करण्यात आली आहे.