अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- आमच्या मुलाचे जीवन बरबाद केली, यावरुन सासरच्या तिघांनी विवाहितेच्या शरीरावर गरम उलाथनीने चटके देत विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना मंगळवारी रात्री शहरातील भराडवस्ती (अकोले नाका) येथे घडली. या संदर्भात शिवानी रमेश जाधव (१९, माळीवाडा) यांच्या फिर्यादीवरुन पारसाबाई चव्हाण,
वकील चव्हाण, सुरेखा चव्हाण (भराडवस्ती, अकोले नाका) यांच्यावर गुन्हा दाखल केला. दोघा महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
वकील चव्हाण फरार झाला आहे. शिवानीचे लग्न अक्षय नाना चव्हाण याच्या सोबत झाले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत.