Ahmednagar Crime : नेवासा तालुक्यातील माका येथे शेतीच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शांतवन रंगनाथ पटेकर (वय ६५, रा. आडगाव, ता. पाथर्डी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
शेती गट नंबर २९९ चा निकाल बाजूने लागल्याने (दि.5) नोव्हेंबरला फिर्यादी व फिर्यादीचे भाऊ फ्रान्सिस रंगनाथ पटेकर, रावसाहेब गोविंद पटेकर शेतीत गेलो असता,
तेथे अमोल राजू पटेकर, पप्पू मधुकर पटेकर, जगन्नाथ किशोर पटेकर, प्रशांत पप्पू पटेकर, राजू मधुकर पटेकर (सर्व रा. पाचुंदा रोड, राजवाडा, माका, ता. नेवासा) व इतर अनोळखी चार ते पाच या सर्वांनी
आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कुऱ्हाड लोखंडी रॉडने मारहाण करून जबर दुखापत करून गंभीर जखमी केले.
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे पुढील तपास करीत आहे.