अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील सावेडी उपनगराला लागून असलेलेल्या निर्मलनगर उपनगरातील सत्कार हौसिंग सोसायटी परिसरातील विज वितरणचा ट्रान्सफॉर्मर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चक्क चोरून नेलाय.
या मुळे रात्री पासून या परिसरातील वीज खंडित असून आज बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत येथील वीज पुरवठा पूर्ववत झालेला नव्हता.
याबाबत औरंगाबाद रोडवरील वीज वितरण कार्यालयात नागरिक सातत्याने फोन करत असले तरी नेहमी प्रमाणे येथील कर्मचारी वीज पुरवठा सुरू होण्यास अजून एकदीड तास लागेल असे सकाळ पासून सांगत वेळ निभावून नेत आहे.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरोधात एफआयआर नोंदवला असल्याचे औरंगाबाद रोड वरील वीज वितरण कार्यालयातून सांगण्यात आले आहे.