Ahmednagar Crime : फटाके फोडू नका, माझ्या अंगावर उडत आहेत, असे म्हटल्याचा राग आल्याने ४ जणांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत एक महिला व एक पुरुष, असे दोन जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संजयनगर परिसरात फिर्यादी दिपक भास्कर अडागळे हा म्हणाला, तुम्ही येथे फटाके वाजवू नका, माझ्या अंगावर येत आहेत.
याचा राग आल्याने आरोपीत शुभम सोमनाथ पवार, सोमनाथ पवार, करण भंडारी व एक अनोळखी मुलगा या चौघांनी हातातील कड्याने डोक्यात मारून फिर्यादीचे डोके फोडले व तसेच साक्षीदार महिला अनिता रवि शिंदे यांना लाथा-बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जखमी केले.
याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दारकुंडे हे करीत आहेत.