Ahmednagar Crime : घरासमोर पडवी टाकायची नाही. या कारणावरुन प्रविण शेजवळ यांना लाकडी दांडा व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे नुकतीच घडली. याप्रकरणी सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण उत्तम शेजवळ (वय ५५) हे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे राहत आहेत. त्यांच्या घराचे जवळ सुरेश सदाशिव काकडे हा त्याचे कुटुंबासह राहतो.
ते नेहमीच कशाचे तरी कारणावरून त्रास देतात. (दि. ३१) ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास प्रविण शेजवळ हे त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पडवीचे काम करीत होते.
त्यावेळी तेथे आरोपी आले व म्हणाले की, तुम्ही या ठिकाणी पडवी टाकायची नाही. ती जागा आमची आहे. त्यावेळी प्रविण शेजवळ त्यांना म्हणाले की, ही जागा ग्रामपंचायतची असून त्या ठिकाणी आम्ही धुणेभांडे धुण्यासाठी सावली करीत आहोत. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला.
तेव्हा आरोपींनी प्रविण शेजवळ व त्यांच्या आईला शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथाबुक्कांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर प्रविण उत्तम शेजवळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आरोपी सुरेश सदाशिव काकडे, किरण सुरेश काकडे, अजय सुरेश काकडे, अमर अशोक काकडे, स्वाती अमोल काकडे, सुनिता सुरेश काकडे (सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.