अहमदनगर क्राईम

चक्क ‘त्या’ अधिकाऱ्याने साईभक्त महिलांना पाठविले अश्लील व्हिडिओ मेसेज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- साईभक्त महिलांना अश्लील व्हिडिओ मेसेज पाठवल्याबद्दल साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील त्या अधिकार्‍याची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी,

अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाबाबत महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत.

याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने स्वाती सुनील परदेशी यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना निवदेन दिले आहे.

दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकार्‍याने मुंबई येथील तसेच आसाम येथील साईभक्त महिलेला जवळीक तयार करून नंतर मोबाईलवरून अश्लिल चित्रफित व मेसेज पाठवले.

यासंदर्भात या महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या महिलांना अश्लील चित्र फोटो पाठवले प्रकरणी संबंधित जनसंपर्क कार्यालयातील अधिकार्‍यांची सखोल चौकशी होऊन यासंदर्भात शहानिशा करून संबंधित अधिकार्‍यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office