अहमदनगर क्राईम

नगर तालुक्यातील दरेवाडी येथे शेतात सुरू असलेल्या कामाच्या वेळी दोन गटात हाणामारी, आ. संग्राम जगताप यांच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल

Published by
Ajay Patil

Ahmednagar news: नगर तालुक्यातील दरेवाडी या ठिकाणी शेतामध्ये सुरू असलेल्या कामाच्या वेळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात फिर्याद दिली असून या प्रकरणांमध्ये एकूण बारा जणांवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच याच प्रकरणांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला असून प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे दिसून आले.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी  आमने सामने आल्याचे देखील पाहायला मिळाले व या सगळ्या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती.

 नगर तालुक्यातील दरेवाडी येथे शेतात काम सुरू असताना दोन गटात हाणामारी निर्माण झाला राजकीय तणाव

नगर तालुक्यातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या कामावेळी दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियातील आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल झाला.

त्यामुळे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी पोलिस ठाण्यात आमनेसामने आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.मच्छिंद्र भानुदास बेरड (४२, रा. दरेवाडी) यांनी घट फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष लहानू सूर्यवंशी, का हरिभाऊ खर्से (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), पवन रामप्रसाद धूत (रा. सारसनगर), जगदीश रामविलास घ करवा (रा. फलटण, जि. सातारा), सिद्धार्थ वे बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी),

संतोष सूर्यवंशी याची दोन मुले (नाव माहित नाही, रा. सारसनगर) व्ह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केन बेरड हे शेत जमिनीत काम करत असताना आरोपींनी शेतीचे लोखंडी जाळीचे कंम्पाऊंड तोडून नुकसान यांन केले. त्याचा जाब विचारल्यावर बेरड यांना शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण केली. बेरड यांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या गटाकडून हरिभाऊ जिजाबा खर्से (रा. बडाणनगर) यांनी फिर्याद दिली दिली आहे. त्यानुसार मच्छिंद्र भानुदास बेरड, दीपमाला मच्छिंद्र बेरड, रंभा भानुदास बेरड, साईनाथ विठठल साळुंखे, आशा निंबाळकर (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.दरेवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खसें हे कपाऊंडचे काम करत असताना आरोपींनी ‘माझ्या शेताच्या तारेचे कंपाऊंड का पाडले, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.घटनेनंतर

आमदार जगतापांवर केलेले आरोप दुपारनंतर मागे

घटनेनंतर बेरड यांनी सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून आमदार संग्राम जगताप यांच्यावर केले. त्यांच्या समर्थकांनी जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले. दुपारी मात्र बेरड यांनी पुन्हा व्हिडिओद्वारे खुलासा करत या घटनेशी आमदार जगताप यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ज्यांनी गैरकृत्य केले त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असेही बेरड यांनी स्पष्ट केले.

जागा मालकाने आरोप फेटाळले ,कायदेशीर कारवाईचा इशारा

कायदेशीर कारवाईचा इशारा जागामालक पवन धूत यांनी त्यांचे वकील अॅड. पीयूष पुरोहित यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन बेरड यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. गट क्रमांक ७७ हे क्षेत्र ३१६ गुंठे आहे. यात पवन रामप्रसाद धूत, जगदीश रामविलास करवा, संतोष लहानू सूर्यवंशी यांची १८८ गुंठे जागा आहे. तसेच, स्नेहल विष्णू मोहिते यांची ८४ गुंठे जागा आहे.

मच्छिंद्र भानुदास बेरड, उमेश बाबासाहेब जायभाय यांची एकत्रित २० गुंठे जागा आहे. मागील वर्षी मोहिते व बेरड यांच्यात करारनामा होऊन बेरड यांना २० गुंठे क्षेत्र निश्चित करून देण्यात आले. इतर जागा मालकांमध्ये जागा विकसित करण्यासाठी हरिभाऊ खर्से यांच्याशी करार झाला. १० सप्टेंबर रोजी त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी बेरड हे सर्वांबरोबर उपस्थित होते.

कोणीही कुणाच्या क्षेत्रात ताबा मारलेला नाही. बेरड यांनी समोरचे केवळ व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्यासाठी मोठ्या राजकीय व्यक्तीचेनाव घेऊन स्टंट केला, असा आरोप यावेळी धूत व अॅड. पुरोहित यांनी केला आहे. इतर भागीदारांशी बोलून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे धूत यांनी सांगितले

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil